सांगोला ग्रामीण रुग्णालयात कर्करोग शिबिरामध्ये एकूण १५६ रुग्णांची केली तपासणी

सांगोला / प्रतिनिधी: कर्करोग आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी व सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना मोफत उपचार मिळावे म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे मोफत कर्करोग तपासणी शिबिर संपन्न झाले. यामध्ये एकूण १५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
या शिबिराचे उदघाटन सांगोला सूतगिरणीचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. फुले, डॉ. बंडगर, सांगोला नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुरेशअप्पा माळी यांच्या सह ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी आदी उपस्थित होते.
सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे
कॅन्सर डायग्नोस्टिक वाहन आल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शिबिरामध्ये रुग्ण तपासण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग, गर्भाशय पिशवी इ. संशयित १५६ रुग्णांची तपासणी केली.
कॅन्सर मोबाईल व्हॅन यामध्येच तपासणी व उपचार सुविधा देण्यात आल्या होत्या. संबंधित डॉक्टरांनी सदर व्हॅनच्या माध्यमातून रुग्णांच्या मोफत तपासण्या करीत त्यांना योग्य तो सल्ला आणि उपचार केले आहेत. या शिबिरासाठी सांगोला शहर व तालुक्यातील रुग्णांनी लाभ घेतला. यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले