देश- विदेश
दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देत मोदींनी पाकिस्तान विरोधात घेतले हे मोठे पाच निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी:जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. “देशाच्या सुरक्षेवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही – आता शब्द नव्हे, कृतीचा काळ आहे,” असा स्पष्ट संदेश देत भारताने पाच निर्णायक पावले उचलली आहेत.
भारत सरकारचे ५ मोठे निर्णय:
- सिंधू पाणी करार स्थगित
1960 मध्ये झालेला भारत-पाकिस्तान सिंधू पाणी करार आता भारत सरकारने तात्पुरता स्थगित केला आहे. हा करार शांततेचं प्रतीक मानला जात होता, पण सातत्याने पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांमुळे भारताने आता निर्णायक भूमिका घेतली आहे. - अटारी-वाघा सीमा बंद
भारत-पाकिस्तानमधील महत्त्वाचा दुवा असलेली अटारी सीमा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना १ मेपूर्वी भारतात परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. - पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद
पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश देण्यासाठीची व्हिसा प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. भारत आता पाकिस्तानमधून येणाऱ्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवणार आहे, ज्यामुळे संभाव्य घातपात टाळला जाऊ शकतो. - पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश
भारत सरकारने देशात असलेल्या पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांना एका आठवड्यात भारत सोडण्याचा आदेश दिला आहे. यावरून भारत आता कोणत्याही प्रकारची नरमाई स्वीकारणार नाही, हे स्पष्ट होते. - दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोग बंद
भारताने दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी लवकरच पाकिस्तानात परत पाठवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे भारत-पाकिस्तान राजनैतिक संबंध पूर्णपणे तुटण्याच्या टप्प्यावर आहेत, असे संकेत मिळत आहेत.
ही कृती म्हणजे केवळ प्रतिक्रिया नसून, भारत सरकारचा स्पष्ट संदेश आहे – देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत आता कोणतीही तडजोड होणार नाही!