
Terrorist attack Pahalgam Jammu and Kashmir
विशेष प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या चार महत्त्वपूर्ण हालचालींमुळे आता मोठी कारवाई होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारत प्रतिउत्तराच्या पार्श्वभूमीवर, २०१६ व २०१९ प्रमाणे सीमापार सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेऊ घेणार. याआधीच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सुमारे ५०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण
दरम्यान, पाकिस्तानातही हालचाली सुरू असून, देशात राजकीय एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भारताकडून कोणताही हल्ला झाल्यास, पाकिस्तानातील सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन त्याचा विरोध करतील.
भारताची पुढील पावले काय असतील?
भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवादी गटांवर संभाव्य कारवाईसाठी हालचाली सुरू आहेत. गुप्तचर माहिती मिळवण्यासाठी दोन लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. याचवेळी सैन्यदलाच्या अहवालानुसार, हवाई दलाच्या विमानाचे सीमेवर गस्त सुरु आहे. आता सर्व हालचालीवर भरताचे लक्ष असून कोणत्याही क्षणी भारत हल्ला करेल.