सांगोला/प्रतिनिधी : डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय अंतर्गत समान संधी कक्ष मार्फत राबविण्यात आलेल्या एकदिवसीय चर्चासत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे कैवारी नसून ते संपूर्ण भारत देशाचे, देशातील सर्व समाजाचे, सर्व घटकांचे कैवारी होते अशी प्रतिपादन प्रा. डॉ. किसन माने यांनी केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या विषयावर व्याख्यान देत असताना आंबेडकरांचे महिलांविषयी तसेच शेतकऱ्यांविषयी विचार मांडले. तसेच शेतकऱ्यांसंदर्भात केलेले काम याबाबत त्यांनी सखोल चर्चा केली.
चर्चासत्रास अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य कुठल्या एका जाती बाबत सीमित नसून ते संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणादायी, आधुनिक समाज बांधणीसाठी उपयुक्त कसे होते याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
समान संधी कक्ष अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सरकार, समाज कल्याण विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मार्फत राबविण्यात आलेल्या स्कॉलरशिप व फ्री शिप संबंधित विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवणे तसेच या योजना राबवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे व विद्यार्थी अशा योजना पासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणे यासाठी सदर कक्ष महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे.
या कक्षाचे चेअरमन प्रा. अशोक कांबळे हे विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्याचबरोबर त्यांना आलेल्या अडचणी विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप फॉर्म भरण्यापासून ते त्यांना स्कॉलरशिप मिळणे पर्यंत विद्यार्थ्यांना मदत करणे यासाठी सदर कक्ष काम करत आहे. प्रा. कांबळे सर यांनी चर्चासत्रामध्ये संविधानाची उद्देशिकाचे वाचन करून विद्यार्थ्यांना संविधानाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेमध्ये प्रा. डॉ. मनोजकुमार माने यांनी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी व वेळेत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच समान संधी कक्षा बाबत व या कक्षाच्या कार्यक्रमासंदर्भात त्यांनी माहिती दिली. सदर चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी प्रा. ज्योतिबा हुर्दुके तसेच प्रा. संतोष भोसले शिक्षकेतर कर्मचारी रणदिवे यांचे विशेष सहकार्य लाभले. चर्चासत्राचे आभार कक्षाचे चेअरमन प्रा. अशोक कांबळे सर यांनी व्यक्त केले.