डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून लूट?
प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी प्राचार्य यांनी ऑफिसमधून चक्क काढला पळ!

सांगोला/विशेष प्रतिनिधी : डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला आणि पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे जादा फी घेतली जात असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कमी फी असल्याची माहिती दिली आहे. असे असताना महाविद्यालय प्रशासन मात्र विद्यार्थ्यांकडून अधिक रक्कम का वसूल करत आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी प्राचार्य यांनी चक्क पळ काढला !
महाविद्यालयात जबाबदार असलेले प्राचार्य सिकंदर मुलाणी यांना विचारणा केली असता, त्यांनी धक्कादायक उत्तर देत सांगितले की, मला याबाबत काहीही माहिती नाही. इतकेच नव्हे तर, फी भरतानाही पावती न दिल्याचा आरोप होत असून, त्यावरही त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी प्राचार्य सिकंदर मुलाणी यांनी त्यांच्याच ऑफिसमधून चक्क पळ काढला.
विद्यार्थ्यांनी केला हे आरोप :
विद्यार्थ्यांचे दिलेल्या माहितीनूसार, प्राचार्य, कार्यालयातील लिपिक, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने फी वसूल केली जाते, मात्र त्याचे कोणतेही अधिकृत पावती (receipt) दिली जात नाहीत. या प्रकारातून विद्यार्थ्यांची सुद्ध फसवणूक आणि दिशाभूल करत असल्याचे सांगितले.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे आर्त हाक
विद्यार्थ्यांनी आता सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे आर्त हाक दिली आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.