देश- विदेशEconomyसांगोला
सांगोल्यात पोलिस खात्यात मोठी हलचाल! अवघ्या १५ महिन्यांत PI भीमराव खणदाळे यांची तडकाफडकी बदली!
पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांची १५ महिन्यातच बदली

सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी विनोद घुगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी यापूर्वी पंढरपूर वाहतूक शाखेचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाला होता. तसेच मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आता त्यांच्याकडे सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांची १५ महिन्यातच बदली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगोला पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे हे २३ जानेवारी २०२४ रोजी यांनी सांगोला पोलीस स्टेशनचा पदभार घेतला होता. केवळ यांना १५ महिन्यातच बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक खणदाळे यांची अचानक बदली करण्यात आली आहे. सांगोला तालुक्यात त्यांच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रचंड वाव मिळत होता का? तसेच अवैद्य धंद्यांना त्यांच्याकडून दुजोरा दिला जात होता का? त्यांच्या कार्यकाळात तालुका हादरून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. अनेक गुन्हाच्या नोंदीसुद्धा तात्काळ केल्या जात नव्हते. पैसे घेऊन सामान्य नागरिकांना नागक त्रास तसेच न्याय मिळत नव्हता का? अश्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत अशी चर्चा आहे.