देश- विदेशसांगोला
कै. पांडुरंग (आबा) भांबुरे यांच्या ३३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त साखर कारखान्याच्या परिसरात अभिवादन

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील सहकारी साखर कारखाना लि. वाकी (शिवणे) चे संस्थापक कै. पांडुरंग (आबा) भांबुरे यांच्या ३३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सांगोला तालुक्यातील साखर कारखान्याच्या परिसरातील त्यांच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आलेगाव विद्यालयाचे संस्थापक बळवंत बाबर, सांगोला साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी बापू बनसोडे, माणिकसिद्ध भांबुरे, प्रतीक पवार, केशव पवार, बाळासाहेब पवार, साखर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पांडुरंग आबा भांबुरे यांनी तालुक्यातील सहकारी चळवळीला भक्कम पाया घातला. त्यांच्या कार्याची आठवण ठेवत कारखान्याच्या परिसरात त्यांना अभिवादन करण्यात आले.