शेतकऱ्यांकडून फलटणच्या नेत्यांना जोडे मारो आंदोलन!

सांगोला/प्रतिनिधी : महूद येथे शिवसेना व निरादेवधर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्याच्या वतीने फलटणचे नेते संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रति कात्मक चित्राला जोडी मारून जाहीर असा निषेध करून घोषणाबाजी करत जोडी मारू आंदोलन करण्यात आले बुधवारी मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब व माजी आमदार शहाजी बापू पाटील साहेब व इतर नेत्यांच्या उपस्थितीत निरादेवधरचे सांगोला तालुक्याला लाभक्षेत्रात तसेच पंढरपूर तालुक्यातील काही भागाला एक टीएमसी पाणी मंजूर करायचे ठरलेअसून तसा शासन निर्णयही झाला आहे.
पिढ्यानपिढ्या पाण्यासाठी धरपडणारी शेतकरी व कष्टकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून कालच शहाजी बापू पाटील साहेब यांचा सांगोल्यात ठीक ठिकाणी सत्कार फटाक्यांची आतिषबाजी व पेढे भरून याचा कार्यक्रम झाला यालाच गालबोट म्हणून काल फलटण येथे काही नेत्यांची बैठक होऊन संजीव राजे निंबाळकर दीपक चव्हाण आदी लोकांनी सांगोला तालुक्याला व पंढरपूरला पाणी देण्याबद्दल विरोध दर्शवला म्हणून आज महूद येथे शिवसेनेच्या वतीने व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने संजीव राजे निंबाळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून विरोधात घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले यावेळी शहाजी बापू पाटील साहेब यांच्या नावाचा जयजयकार करण्यात आला यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे संजय मेटकरी राजेंद्र मिटकरी
सरपंच सुरेश कदम कालिदास भोसले प्रमोद उबाले नवनाथ येडगे ओंकार पाटील अरुण भाऊ नागणे सोमनाथ मरगर तानाजी भोसले उदयसिंह पाटील दीपक सरगर चेअरमन महेश पाटील कुंडलिक पवार अमोल सरडे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते यावेळी शिवसेना नेते दादासाहेब लवटे यांनी मा आमदार शहाजी बापू पाटील यांची काम करण्याची पद्धत कशी योग्य आहे पाण्यासाठी असणारी तळमळ किती बरोबर आहे परंतु विद्यमान आमदार व विद्यमान खासदार या विषयावर पाणी आम्ही आणलं म्हणून दावा करतात व आतील बाजूनी फलटणची बाजू घेतात अशी घनाघाती टीका करत आमदार व खासदार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान केले