
in public news sangola
सांगोला | महेश लांगडे : सांगोला शहर व तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री अंबिकादेवी यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २ जानेवारी रोजी रंगभरण स्पर्धा आणि सोमवार, ३ जानेवारी रोजी ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा होणार आहे.
रंगभरण स्पर्धा – २ जानेवारी
गटवर्गीकरण:
1 पहिला गट: इयत्ता १ ली ते ४ थी
2 दुसरा गट: इयत्ता ५ वी ते ७ वी
3 तिसरा गट: इयत्ता ८ वी ते १० वी
प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना कोर्ट रिसिवर व श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समितीच्या वतीने आकर्षक बक्षीसे दिली जातील.
ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा – ३ जानेवारी
विद्यार्थी गट: इयत्ता ८ वी ते १० वी
प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी खालील संपर्क व्यक्तींशी संपर्क साधावा:
ॲड. सारंग वांगीकर
ॲड. विक्रांत बनकर
ॲड. नितीन बाबर
ॲड. विशालदीप बाबर
ॲड. शशिकला खाडे
ॲड. महेंद्र पत्की
सांगोला शहरातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा एक उत्तम संधी असून, स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.