Big Breaking : म्हैशाळचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांचा मनमानी कारभार!

सांगोला/प्रतिनिधी : पारे मोटे वस्ती येथील म्हैशाळ कालवा योजनेतील मायनेरी कालवा क्रमांक 1(2 नंबर आउटलेट वॉल)मधून येणारी काळी 8 इंची पाईपलाईन ही निकृष्ट दर्जाची वापरल्यामुळे. बाळू पडळकर ते अप्रुफा नदी. मध्यंतर मोटे वस्ती येथील शेतकरी भाऊसो बाबा मोटे यांच्या शेतामध्ये पाईपलाईन गळती झाली दिनांक 20 मार्च 2025. रोजी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी गट क्रमांक112/4.
या शेतामध्ये कोहिनूर जातीचे खरबूज दीड एकर इतके क्षेत्रात पाणी शिरून तोडणीसाठी आलेले खरबूज फळ पिकाचे अतोनात नुकसान झाले. अंदाजे 30टन फळ पिक वाया गेले. असून 9 ते 10 लाख रुपये एवढ्या किमतीचे खरबूज पिकाचे नुकसान झाले आहे. दि. 20 मार्च 2025 ते दि. 24 मार्च 2025 पर्यंत पूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेले.वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ कळवून देखील त्यांनी पाणी बंद करण्यास विलंब केला. त्यामुळे फळपीक पूर्ण उध्वस्त झाले. म्हैसाळ कालवा उपविभाग क्रमांक 1 सांगोला.
सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना अर्ज देऊनही या शेतकऱ्यास कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही व त्याकडे दुर्लक्ष करत आहे.जर का या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही तर उपोषण करणार असा इशारा दिला आहे.