धरती, कुलदैवता, आई हीच आपली खरी दैवतं : आम शहाजीबापू पाटील

सांगोला (चोपडी)/प्रतिनिधी : “धरती, कुलदैवत आणि आई या तिघींमध्ये शक्ती आहे. त्या आपली खरी दैवतं आहेत,” असे गौरवोद्गार माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी रानमळा-चोपडी येथील श्री भोजलिंग यात्रा आणि कृष्णा संदिपान बाबर व्यासपीठ लोकार्पण सोहळ्यानिमित्त व्यक्त केले.चैत्र पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या श्री भोजलिंग यात्रेच्या दिवशी शनिवार, १२ एप्रिल २०२५ रोजी या भव्य व्यासपीठाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या वेळी ते म्हणाले, आपली कुलदैवतं कुटुंबाचं रक्षण करतात. त्यांची सेवा आणि पूजाच आपल्याला सामर्थ्य देते. या उपक्रमातून ग्रामीण भागात नवी प्रेरणा मिळते.
कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन भिकाजी बाबर, उद्योगपती सतीश पाटील, प्रा. डॉ. संजय बाबर, चंद्रकांत बाबर फौजी, इंजिनिअर गणेश बाबर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकात प्रा. डॉ. संजय बाबर यांनी यात्रेची पारंपरिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २०१६ पासून भंडाऱ्याला यात्रेचे स्वरूप दिले गेले असून हा उपक्रम धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे.
शहाजीबापू पाटील यांच्या आमदार निधीतून पॅविंगब्लॉकच्या कामामुळे मंदिर परिसर अधिक सुंदर झाला आहे. याच व्यासपीठावर भविष्यात विविध सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रम होणार आहेत. कार्यक्रमात कॉन्ट्रॅक्टर भारत टाकळे, इंजिनिअर अजय बनसोडे, राजेंद्रजी मीना व शिव बाबुराव बाबर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.इंजिनिअर गणेश बाबर यांनी भावनिक शब्दांत आपल्या मनोगतात सांगितले की, “हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय असून शहाजीबापूंची उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बाबर यांनी केले.