यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार देवेन्द्र कोठे महापालिकेच्या आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे अतिरिक्त आयुक्त रवि पवार अतिरिक्त संदीप कारंजे, उपायुक्त तैमूर मुलाणी,उपायुक्त आशिष लोकरे,सहायक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीष पंडित,सह. नगर रचना संचालक मनिष भीष्णूकर नगर अभियंता सारिका आकूलवार, सर्वाजनिक आरोग्य अभियंता व्यकटेश चौबे आरोग्य अधिकारी राखी माने तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.प्रथम महापालिकेचे आयुक्त यांनी पालकमंत्री महोदय यांचा स्वागत केलं त्यानंतर मा. आयुक्त यांनी आरोग्य विभागा मार्फत जगजीवन राम झोपडपट्टी येथे भागामध्ये संपूर्ण सर्वेक्षण करण्यात येत असून त्याठिकाणी पाणी तपासणी,फवारणी, दुरावणी करणे तसेच महानगरपालिकेतर्फे बाधीत क्षेत्रामध्ये फिरता दवाखाना चालू करण्यात येणार आहे.नागरिकांची आरोग्य तपासणी अश्या विविध उपाय योजना करण्यात येत आहे तसेच त्या भागात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन हे काही ठिकाणी ड्रेनेज लाईन मधून गेल्या मुळे त्या भागात दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तसेच पाईप लाईन बदलण्या संदर्भात संबंधित विभागाला आदेश दिले असून त्या साठी निधी उपलब्ध करून मिळावी अशी विनंती केली. यावेळी पालकमंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी घडलेली घटना ही दुर्दैवी असून त्या विद्यार्थ्यांसोबत असलेल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे यावे तसेच अशा काही रुग्ण आढळल्यास त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यात यावे. त्याचबरोबर या भागामध्ये ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन मध्ये पिण्याचे पाण्याची लाईन गेलेले आहेत त्याच्यासाठी दोन कोटी निधी उपलब्ध करून देऊ तातडीने त्या भागातील पाईपलाईनचे काम हाती घेण्यात यावे असे सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या तसेच मा मुख्यमंत्री महोदय यांच्याशी संपर्क साधून मृत झालेल्या विद्यार्थ्यांना पाच लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदय यांनी पाठविण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने महापालिका यांनी तातडीने तो प्रस्ताव पाठवण्यात यावा. अशा सूचना महापालिकेला देण्यात आल्या तसेच सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्टी ज्या ठिकाणी अशा ड्रेनेज लाईन आहेत त्याच्याही सर्वे करून त्यालाही निधी उपलब्ध करून देऊ असे ग्वाही पालकमंत्री महोदय यांनी दिले. त्याचबरोबर जगजीवन राम झोपडपट्टी या ठिकाणी 15 ते 20 दिवस आरोग्य तपासणी आरोग्य कक्ष या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा. या ठिकाणी कायमस्वरूपी आपला दवाखाना सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या. आरोग्य विभाग पाणीपुरवठा यांना पुन्हा अशी घटना घडू नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.
