मंगेश चिवटे, सतीश सावंत यांनी सांगोल्यात प्रथमच महाआरोग्य शिबिर भरवले : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सांगोला : आरोग्य शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की गेल्या अडीच वर्षात शासनाकडून मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेचे काम केले असून,मुख्यमंत्री सहायता निधीतून 450 कोटी रुपये देण्यात आले. राज्यात हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम या मुख्यमंत्री सहायता निधीतून केले. काही आजारावरील उपचाराचा खर्च सामान्य कुटुंबांना परवडणारे नसतात.
सामान्य कुटुंबातील नागरिकांना मोठ्या आजारावरती तात्काळ उपचार मिळावेत यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाख रुपयांपर्यंत होती त्याची शासनाने मर्यादा वाढवून पाच लाख रुपये पर्यंत केली आहे. तसेच त्यामधील अटी शर्ती देखील कमी करण्यात आल्या आहेत. राज्यातील साडेबारा कोटी जनतेला यातून आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.