देश- विदेशसांगोला
श्रीरामनवमीनिमित्त सांगोल्यात आज भव्य शोभायात्रा; प्रभू श्रीरामांची आकर्षक मूर्ती प्रमुख आकर्षण

सांगोला : श्रीरामनवमी निमित्ताने आज सांगोला शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम प्रतिष्ठान सांगोला आणि सकल हिंदू समाज सांगोला तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने ही शोभायात्रा पार पडणार आहे.
या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांची अत्यंत सुबक आणि देखणी मूर्ती, जी भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहे. ही शोभायात्रा आज दुपारी ठिक ४ वाजता वाढेगाव नाका येथून सुरू होणार आहे. या शोभायात्रेस सांगोला तालुका व शहरातील सर्व श्रीराम भक्त आणि हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठान सांगोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जय श्रीराम!