
Water Resources Minister Dr. Radhakrishna Vikhe Patil
सोलापूर/प्रतिनिधी : जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ महाराष्ट्र) मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील हे शनिवार दि.05 एप्रिल 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
दि.05 एप्रिल 2025 रोजी अहिल्यानगर येथून सोलापूर विमानतळ येथे सकाळी 09.45 वा आगमन व सकाळी 10.00 वा. शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 10.015 वा. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून मोटारीने सांगोला कडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. सांगोला येथे आगमन व 21 व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेस उपस्थिती (स्थळ-सांगोला महाविद्यालय सांगोला) त्यानंतर दुपारी 12.30 वा. सांगोला महाविद्यालय येथून मोटारीने चेतनसिंह केदार- जिल्हाध्यक्ष भाजपा यांचे निवासस्थानाकडे प्रयाण. व दुपारी 12.40 वा चेतनसिंह केदार-सावंत यांच्या निवास्थानी आगमन व राखीव. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता चेतनसिंह केदार-सावंत यांच्या निवासस्थान सांगोला येथून मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा सोलापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 3.00 वा. सोलापूर येथून विमानाने शिर्डीकडे प्रयाण करतील.