अत्यंत सामान्य परिवारात जन्म घेतलेल्या ना. जयकुमार गोरे यांनी प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली. जनतेच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असणाऱ्या जयकुमार गोरे यांना म्हणूनच माण खटावच्या जनतेने सलग तीन वेळा विधानसभेत पाठवले आहे. जनतेशी आणि त्यांच्या प्रश्नांशी बांधील असलेल्या जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याने आता संपूर्ण जिल्ह्याच्या आणि खासकरून सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
जयकुमार गोरे हे सांगोला तालुक्याच्या शेजारीच असलेल्या मतदारसंघाचे नेतृत्व करत असल्याने त्यांना सांगोला तालुक्यातील जनतेच्या समस्या माहित आहेत. अत्यंत सामान्य परिवारातुन पुढे आलेल्या जयकुमार गोरे या लढवय्या आणि प्रामाणिक नेतृत्वाचा तमाम सांगोलकरांच्या वतीने सन्मान करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आगामी काळात सांगोला तालुक्याचे प्रश्न ते नक्कीच सोडवतील असा विश्वास व्यक्त करत गुरुवार दि. ३ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे सायंकाळी ६.३० वा होणाऱ्या सत्कार समारंभाला तमाम सांगोलकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी म्हटले.
