
Minister Radhakrishna Vikhe-Patil
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला महाविद्यालयामध्ये येत्या शनिवार व रविवार दि. ५ व ६ एप्रिल २०२५ रोजी एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषेदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उदघाटन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील याचे शुभहस्ते होणार आहे. यावेळी जलसंपदा सचिव डॉ.संजय बेलसरे, कार्यकारी संचालक अतुलजी कपोले, सरपंच पोपटराव पवार राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष, डॉ.दि.मा. मोरे, या परिषदेचे स्वागताध्यक्ष तथा सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव(भाऊ) गायकवाड यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र सिंचन सहयोग या संस्थेच्या वतीने “पाणी आणि सिंचन” या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते. या संस्थेने यापूर्वी राज्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी वीस पाणी परिषदा घेऊन हजारो तज्ज्ञ मार्गदर्शकांना व जलचिंतकांना एका मंचावर आणले. यावर्षी एकविसावी महाराष्ट्र सिंचन परिषेद सांगोला येथे सांगोला महाविद्यालयामध्ये होत आहे. “हवामानातील दोलाईमानता आणि सिंचन व्यवस्थापन” हा या परिषदेचा मुख्य विषय आहे, त्याचबरोबर आधुनिक सिंचन प्रणाली, सिंचनाच्या भावी दिशा, सिंचित शेतीतील प्रयोग, फळबाग शेती या विषयावर मार्गदर्शन व प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव या परिषदेमध्ये शेतकऱ्यांना ऐकायला मिळणार आहेत.
या राज्यस्तरीय सिंचन परिषदेमध्ये शनिवारी दि.५ एप्रिल रोजी राजेंद्र पवार (बारामती) तुषार जाधव (बारामती), डॉ. अशोक कडलग (पुणे), डॉ. राहुल तोडमल (बारामती) डॉ. बी.डी.जडे (जळगाव), सोमनाथ जाधव (जळगाव), संतोष डांगे(जळगाव), डॉ.सुरेश कुलकर्णी, हनुमंत देशमुख, लक्ष्मीकांत वाघावकर, गोवर्धन कुलकर्णी, राजेंद्र कासार (पुणे), अनिल दडीच,ज्ञानदेव बोडके (माण) डॉ.विनोद पाटील, (उदगीर), सीमा जाधव (पुणे), शेलेन्द्र गाताडे (मालगाव), सुनील काटकर ( कोल्हापूर), वंदना दाभाडे, केशवराव मिसाळ (सांगली), गोवर्धन ढोबळे (वाशीम), डॉ. आ. गो. पुजारी (सांगोला), अरुणा शेळके, रावसाहेब पुजारी, बाळासाहेब मेटे, प्रा.डॉ.बी.डी. पाटील हे मागदर्शन करणार आहेत.
रविवारी दि. ६ एप्रिल रोजी डॉ. विलास शिंदे (कोल्हापूर), प्रभाकर चांदणे(सांगोला), वसंत घनवट (माळेगाव), केशवनाना भोसेकर(सांगोला), सुधाकर चौधरी (सिंधखेडराजा), स्नेहल लोंढे (कवठेमहांकाळ), प्रताप चिपळूणकर (कोल्हापूर), डॉ. भगवानराव कापसे (जालना), रा. बा. घोटे, नारायण देशपांडे, रामलिंग मुंगळीकर, अनिरुद्ध पुजारी (सांगोला), डॉ.मचीन्द्रसोनलकर, रमेश जवळगे (लातूर), रणजीत जोशी (सोलापूर) मार्गदर्शन करणार आहेत तर पद्मश्री पुरस्कार प्राप्त सरपंच पोपटराव पवार यांचे उपस्थितीमध्ये या सिंचन परिषदेचा समारोप समारंभ होणार आहे. या सिंचन परिषदेचा लाभ अधिक अधिक शेतकऱ्यांनी घ्यावा असे अवाहन महाराष्ट्र सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष, डॉ. दि. मा. मोरे, या परिषदेचे स्वागताध्यक्ष तथा सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव(भाऊ) गायकवाड, सचिव अॅड.उदय(बापू) घोंगडे, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.