
पाथर्डी/प्रतिनिधी : पाथर्डी तालुक्यातील धुमटवाडी येथे एक धक्कादायक दुहेरी मृत्यूची घटना समोर आली आहे. एका तरुणीचा अज्ञात हत्याराने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला, तर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
१३ मार्चपासून बेपत्ता असलेल्या दोघांचे मृतदेह २२ मार्च रोजी डोंगरात आढळले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, दोन्ही कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
खून आणि आत्महत्येमागचे गूढ
वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तरुणाने तरुणीचा खून करून नंतर स्वतः आत्महत्या केली. दोघांमध्ये नक्की काय वाद होता? ही घटना प्रेमसंबंधातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे? याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? हे डॉक्टरांच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.