
सांगोला/अविनाश बनसोडे : सांगोला तालुक्यातील महुद येथे गुरुवारी रात्री एका ट्रकची तोडफोड करून घरात घुसून कोयता, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची घटना घडली. या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ट्रकची तोडफोड करून घरात घुसून हल्ला
गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संजय बिरा घोडके यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या ट्रकची अज्ञात कारणावरून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या घरात घुसून कोयता आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात संजय घोडके आणि त्यांचे भाऊ अजय घोडके गंभीर जखमी झाले.
बिग ब्रेकिंग ! चोरट्यांचा पतसंस्था कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!
४ जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
तानाजी सुनील लवटे
विकास लवटे
शिवाजी लवटे
अशोक मारुती इरकर (सर्व रा. महुद)
पोलिसांत फिर्याद दाखल; पुढील तपास सुरू
या हल्ल्याबाबत संजय बिरा घोडके (वय २४, रा. महुद) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.