मुंबई / विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानसभेने समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आनंद
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करत म्हटले –
“हा ठराव केवळ महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा सन्मान करणारा नाही, तर ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरवही वाढवणारा आहे. संपूर्ण देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणाऱ्या या निर्णयासाठी सर्व विधीमंडळ सदस्यांचे मी आभार मानतो.”
सोलापूर जिल्ह्यातील पहिला शिलालेख : यादव राजा महादेवराव यांचे मंदिर दान
महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या योगदानाची आठवण
महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी समाजाच्या मागासलेल्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू करत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
आज महिलांना शिक्षण, संशोधन, विज्ञान, राजकारण आणि समाजकारणात योगदान देता येते, त्याचे श्रेय त्यांना जाते.
शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी मोठे कार्य केले.
‘भारतरत्न’ पुरस्काराचा सन्मान वाढवणारा ठराव
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले –
“फुले दांपत्याचे कार्य अलौकिक होते. त्यामुळेच ते कायम महात्मा राहतील. महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला हा ठराव लोकभावनेचा सन्मान करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे.”
