पंढरपूरच्या सिंहगडमध्ये टेक्नोझील २०२५ स्तुत्य उपक्रम
कोडिंग, GUI, आणि इंजिनिअरिंग गेमिंग कॉम्पिटीशन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या

पंढरपूर/हेमा हिरासकर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये संगणक अभियंत्रिकी विभाग अंतर्गत, असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्टुडंट्सच्या वतीने, शनिवार दि. १५ मार्च २०२५ रोजी टेक्नोझील २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, संगणक अभियंत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. बाळकृष्ण जगदाळे, प्रा. सुमित इंगोले, तसेच ACSES चे अध्यक्ष गीता नवले आणि उपाध्यक्ष कुलदीप गोडसे उपस्थित होते.
डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात प्राध्यापक-विद्यार्थ्यांच्यात राडा?
यामध्ये कोडिंग, GUI, आणि इंजिनिअरिंग गेमिंग कॉम्पिटीशन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तसेच सर्व विद्यार्थी समन्वयक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. या स्पर्धांमध्ये २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून देत सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.