Sunita Williams Return: सुनीता विल्यम्स यांची सुरक्षित घरवापसी, ७ मिनिटांचा ब्लॅकआऊट, १९०० डिग्री तापमान…

वॉशिंग्टन : सुनीता विल्यम्स नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या आहेत. बुधवारी पहाटे स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल सुनीता यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन फ्लोरिडाच्या समुद्रात उतरले. अंतराळातून पृथ्वीवर हा प्रवास १७ तासांचा होता. परंतु लँडिंगच्या या प्रक्रियेत श्वास रोखून धरणारा ७ मिनिटांचा एक क्षणही होता.
सुनीता विल्यम्स आणि बुच ९ महिने काय खाऊन जिवंत राहिले? अंतराळ स्थानकात अंतराळवीरांना अन्न कसे मिळते, सर्व काही जाणून घ्या
नासाने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतले आहेत. हे अंतराळवीर गेल्या वर्षी जूनमध्ये केवळ आठ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळ स्थानकात गेले होते, परंतु यानामध्ये बिघाड झाल्याने ते तिथेच अडकले. नऊ महिन्यांहून अधिक काळानंतर त्यांची आता घरवापसी शक्य झाली आहे. अशा परिस्थितीत, आठ दिवसांच्या मिशनच्या तयारीने गेलेल्या अंतराळवीरांना नऊ महिने अंतराळात राहावे लागले.
Splashdown confirmed! #Crew9 is now back on Earth in their @SpaceX Dragon spacecraft. pic.twitter.com/G5tVyqFbAu
— NASA (@NASA) March 18, 2025
ताज्या अन्नाची कमतरता
त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी झाली, असा प्रश्न निर्माण होतो. अखेर सुनीता आणि बुच इतका वेळ अंतराळात काय खात होते? द न्यूयॉर्क पोस्टने गेल्या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी सांगितले होते की, नासाचे अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पिझ्झा, रोस्ट चिकन आणि झिंगा कॉकटेल खात आहेत. मर्यादित प्रमाणात ताज्या उत्पादनामुळे, क्रू मेंबर्स त्याचे सेवन फक्त पौष्टिक आहार राखण्यापुरतेच मर्यादित ठेवतात.
अंतराळात अंतराळवीरांना मर्यादित प्रमाणात पावडर दूध, पिझ्झा, भाजलेले चिकन, झिंगा कॉकटेल आणि धान्य मिळत होते. नासाचे डॉक्टर अंतराळवीरांना आवश्यक कॅलरी मिळत आहेत की नाही यावर लक्ष ठेवत होते. नासाने ९ सप्टेंबर रोजी एक फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये विल्मोर आणि विल्यम्स जेवण करताना दिसत होते.