Economyसांगोला

फॅबटेक मल्टीस्टेटने जपली माणूसकी! मयत कर्जदार महिलांचे ५७ लाख १९ हजार रुपयांचे कर्ज माफ

ना जीआर, ना घोषणा, थेट अंमलबजावणी हे फक्त फॅबटेक मल्टीस्टेटचं करू शकते


सांगोला/महेश लांडगे : मार्च अखेरमुळे विविध बँका, मल्टीस्टेट, पतसंस्था यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी सध्या मोठा धुमधडाका सुरू असताना, नामवंत फॅबटेक मल्टीस्टेटने एक दोन नव्हे तर तब्बल 90 मयत कर्जदार महिलांचे ५७ लाख १९ हजार रुपयांचे कर्ज माफ करून फॅबटेक मल्टीस्टेटने माणूसकी जपली आहे. सदर कर्जदार मयत महिलांच्या नातेवाईकांना महिला दिनाचे औचित्य साधून कर्जमाफीचा दाखला देखील देण्यात आला आहे. ना जीआर, ना घोषणा, थेट अंमलबजावणी हे फक्त फॅबटेक मल्टीस्टेटचं करू शकते यानिमित्ताने फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक आणि स्वागत होत आहे.

घरातील एखादा कर्ता पुरुष अचानक गेल्यानंतर त्या कुटुंबाची मोठी हानी होत असते. पण त्याच्यामागे घराची सर्व जबाबदारी त्या घरच्या महिलेवर येत असते, परंतु कुटुंबातील महिलेचे जर काही बरे वाईट झाले तर त्या घराचा आधारच नाहीसा होतो, त्यातच जर एखाद्या वित्तीय संस्थेचे कर्ज संबंधिताकडे असेल तर त्या कुटुंबाची आणखी अडचण होते. घराचा मुख्य माणूसच नाहीसा झाला तर त्या कुटुंबाची होणारी आर्थिक कोंडी, घरावर ओढवणारे सावट यासर्व गोष्टींची सामाजिक जाणिव लक्षात घेऊन सांगोल्यातील फॅबटेक मल्टीस्टेटने आपल्या कार्यक्षेत्रातील एकूण 90 मयत कर्जदार महिलांचे थकीत पडलेले 57 लाख 19 हजार रुपयांचे कर्ज माफ करीत त्यांच्या कुटुं‌बियांना मोठा आधार देण्याचे काम केले आहे.

यामधील 90 मयत कर्जदार महिलांचा समावेश होता. यासर्वच महिला  कुटुंबातील कर्त्या स्त्री होत्या. त्यांच्यावरच सर्व कुटुंबाची जबाबदारी होती.  अशातच त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय हवालदिल झाले होते. त्याचवेळी फॅबटेक मल्टीस्टेट को – ऑ क्रेडिट सोसायटी लि.सांगोला” संस्थापकिय चेअरमन मा. भाऊसाहेब रुपनर यांनी सांत्वन भेटीवेळी संस्थेने त्यांचे कर्ज पूर्ण सुरक्षित केले आहे. तुम्ही काळजी करू नका, असा धीर दिला. त्यामुळे कुटुंब व नातेवाईक यांनी संस्थेचे आभार मानले. संस्था आमच्या अडचणीच्या वेळी अगदी देवासारखी धावून आली, असे उद्‌गार संबंधित 90 कुटुंबातील नातेवाईकांनी काढले.

संस्थापक चेअरमन भाऊसाहेब रुपनर म्हणाले, फॅबटेक मल्टीस्टेट ही संस्था 500 कोटींच्या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल करत असून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात एकूण 30 शाखा कार्यरत आहेत, जिथे सर्वसामान्य व वंचित घटकांचा, त्यांच्या आर्थिक सक्षमतेचा विचार पहिला केला जातो, त्यासाठी योग्य त्या कर्जसुविधा आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण उपलब्ध करत असतो, आणि याचा बऱ्याच महिलांना व लघु उद्योजकांना आजवर फायदा झालेला आहे, यापुढेही होत राहणार आहे, सर्वसामान्यांच्या प्रगतीत आमच्या “फॅबटेक मल्टीस्टेट”ची प्रगती दडलेली आहे, डॉ. सूरज रुपनर म्हणाले, फॅबटेक मल्टीस्टेट ने नेहमीच सभासदांना उत्तम सेवा देण्याचा मानस ठेवलेला आहे, आणि त्याप्रमाणे आपण आजवर सामाजिक बांधिलकीही जपली आहे. सहकाराअंतर्गत सहकार या तत्वानुसार फॅबटेक मल्टीस्टेट ही संस्था आपली जबाबदारी घेत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button