
विशेष वृत्त : “ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (MSRTC) आज ७७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. एस.टी. या नावाने घराघरात ओळख निर्माण केलेल्या या संस्थेने गेली सात दशके राज्यातील लाखो नागरिकांच्या जीवनाशी असलेला आपला दुवा दृढ ठेवला आहे.
१९४८ पासून कार्यरत असलेल्या या महामंडळाने महाराष्ट्रातील दूरदूरच्या गावांना जोडणारे एक विशाल वाहतूक जाळे निर्माण केले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात सेवा देताना प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित, नियमित आणि विश्वासार्ह सेवा पुरवण्याचा प्रयत्न एस.टी. महामंडळ सातत्याने करत आले आहे.
आजही अनेक ग्रामीण भागांतील विद्यार्थी शिक्षणासाठी, शेतकरी बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी, कामगार आपल्या रोजीरोटीसाठी आणि सामान्य माणूस दैनंदिन गरजांसाठी एस.टी.वर अवलंबून आहेत. दुसरीकडे शहरांतील प्रवाशांसाठी शिवनेरी, अश्वमेध, शिवशाहीसारख्या आधुनिक बससेवाही सुरू करण्यात आल्या आहेत.
एस.टी. महामंडळाच्या या ७७ वर्षांच्या प्रवासात प्रत्येकाने कधी ना कधी प्रवास केलेला असतो, आणि अशा प्रवासाशी निगडित अनेक आठवणी आपल्या मनात घर करून असतात. वर्धापनदिनाच्या निमित्ताने त्या स्मृतींना उजाळा देण्याची ही योग्य वेळ आहे.
एस.टी. महामंडळाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व प्रवासी, कर्मचारी आणि राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा!
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!