देश- विदेशमहाराष्ट्रसांगोला

महात्मा फुले चौकात २ कार, दुचाकीचा अपघात; पोलीस निरीक्षक स्वतः घटनास्थळी उपस्थित असताना दुर्लक्ष केल्याने संताप!

पोलीस निरीक्षक स्वतः घटनास्थळाची पाहणी न करता निघून गेले : नागरिकांचा संताप!  


सांगोला/प्रतिनिधी : सांगोला शहरातील महात्मा फुले चौक मोठा अपघात झाला. वासूद रोडकडून येणाऱ्या एका भरधाव कारने रस्त्यावर थांबलेल्या दुचाकीला शुक्रवारी सायं. ७.३० च्या सुमारास जोरदार धडक दिली, त्यामुळे दुचाकी पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या कारवर आदळली. या तिहेरी अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. मात्र सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खणदाळे यांची प्रतिक्रिया नागरिकांना आश्चर्यचकित करणारी ठरली. त्यांनी शासकीय गाडीतून घटनास्थळी गर्दी का जमली आहे याची चौकशी केली, पण गाडीतून खाली उतरून पाहणी व तपास न करता निघून गेले. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

गर्दीचा मार्ग, अपुऱ्या उपाययोजना

वासूद चौक ते महात्मा फुले चौक हा सांगोल्यातील प्रमुख रहदारीचा मार्ग मानला जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खाण्याचे स्टॉल्स, फळ-भाजी विक्रेते आणि अन्य दुकाने असल्याने नेहमीच येथे प्रचंड गर्दी असते. वाहतुकीची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 

पोलीस निरीक्षक स्वतः घटनास्थळाची पाहणी न करता निघून गेले : नागरिकांचा संताप!  

इन पब्लिक न्यूजशी बोलताना नागरिक म्हणाले, अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे अपघात घडल्यानंतर सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खणदाळे स्वतः घटनास्थळाची उपस्थित होते. परंतु गाडीतून खाली न उतरता गाडीतून जमलेल्या नागरिकांना विचारतात काय झाले. नागरिकांनी अपघात झाल्याचे सांगून देखील गाडीतून खाली न उतरता व  पाहणी न करता निघून गेले. अश्या घटनांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल केला आणि सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या पोलीस निरीक्षक यांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button