सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावात विजेचा धक्का लागून २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. सोनू दीपक मंडले वय २०, रा. मेडशिंगी असे मृत तरुणाचे नाव आहे.
सोनू मंडले याला राहत्या घरी विजेचा जोरदार धक्का बसला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेहण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
या घटनेबाबत ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगोला पोलिस ठाण्यात खबर दिली असून, याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983
