अहिल्यानगर/प्रतिनिधी: अहिल्यानगर पोलिसांनी अलीकडेच राबवलेल्या शोधमोहीमेत १४ पाकिस्तानी नागरिक सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १३ महिला आणि १ पुरुषाचा समावेश आहे. या सर्वांनी विवाहाच्या माध्यमातून भारतात प्रवेश केला करून विवाह केला.
व्हिसाची मुदत वाढवलेली; परंतु किती जण राहतात?
पोलिस दिलेल्या माहितीनुसार, या सर्व नागरिकांनी व्हिसाची मुदत वेळोवेळी अधिकृतरीत्या वाढवलेली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या भारतातील वास्तव्यास कायदेशीर रूप आहे. मात्र, याशिवाय अवैधरित्या राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या किती आहे, याचा ठोस अंदाज नाही. हा प्रश्न प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
कायद्यानुसार या नागरिकांना भारतात राहण्याचा अधिकार मिळू शकतो, मात्र त्यांच्या भारतावरील निष्ठेविषयी प्रश्न उपस्थित होतात. भारतात राहून भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी होण्याच्या घटना इतिहासात घडल्या आहेत. अलीकडील पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळाल्याचे निष्पन्न झाले होते.
स्थानिक प्रशासनाची जबाबदारी वाढली
अहिल्यानगरमध्ये आढळलेले १४ नागरिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राहत आहेत, पण यापेक्षा अधिक नागरिक अवैधरित्या राहत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिस, प्रशासन, आणि नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.
सामान्य नागरिकांनीही सावध
या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांचीही जबाबदारी वाढते. संशयास्पद, अनोळखी व्यक्तीबाबत तात्काळ माहिती प्रशासनाला देणे हे नागरिकांचे कर्तव्य ठरते. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल आवश्यक आहे.
