Economy

आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा नियुक्त

30 वर्षांत या महत्त्वपूर्ण क्षेत्रात पार पडल्या  जबाबदाऱ्या


इन पब्लिक न्यूज वृत्तसेवा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) नवीन गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील तीन वर्ष त्यांचा कार्यकाल असेल. सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा 10 डिसेंबर रोजी कार्यकाल संपणार आहे.

कोण आहेत संजय मल्होत्रा

संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचचे राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये ते आरईसीचे चेअरमन आणि एमडी म्हणून त्यांनी काम केले आहे. याआधी त्यांनी ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणूनही काम केले आहे. आयआयटी कानपूर येथून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली असून प्रिन्सटन विद्यापीठातून मास्टर्स पूर्ण केले आहे. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी ऊर्जा, वित्त, कर, आयटी आणि खाणकाम यांसारख्या विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

या वर्षापासून आरबीआयसोबत

2022 मध्ये, वित्तीय सेवा विभागाचे (DFS) सचिव म्हणून काम करत असताना, संजय मल्होत्रा यांची केंद्र सरकारकडून आरबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती.

शक्तिकांत दास यांचा असा आहे कार्यकाळ

शक्तिकांत दास यांनी सहा वर्षांपूर्वी उर्जित पटेल यांच्या अनपेक्षित राजीनाम्यानंतर आरबीआयचे गव्हर्नरपद स्वीकारले होते. कोविडच्या काळात आणि नंतरच्या महागाईच्या संकटाचा सामना करताना त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र, त्यांच्या कार्यकाळाच्या विस्ताराबाबत कोणतीही चर्चा न होणे विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>Appointments Committee of the Cabinet has appointed Revenue Secretary Sanjay Malhotra as the next Governor of the Reserve Bank of India for a three-year term from 11.12.2024 <a href=”https://t.co/4UfunEGEuH”>pic.twitter.com/4UfunEGEuH</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href=”https://twitter.com/ANI/status/1866090758933205128?ref_src=twsrc%5Etfw”>December 9, 2024</a></blockquote> <script async src=”https://platform.t witter.com/widgets.js” charset=”utf-8″></script


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button